आपण यशाचे मोजमाप अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या कमाई किंवा पदावरून करतो. पण हे मोजमाप अपूर्ण आहे. मोठा पगार आणि उच्च पद हेच यशाची खरी मापदंडे नाहीत.
खऱ्या संपत्तीचे चार मुख्य स्तंभ आहेत जे एक आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत:
1. आर्थिक संपत्ती (पैसा):
आपल्याकडे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी पुरेसा पैसा असणे आवश्यक आहे. यात अन्न, कपडे, निवारा, वाहतूक आणि आरोग्यसेवा यांचा समावेश आहे. पुरेसा पैसा असल्यास, आपण अचानक आर्थिक संकटात सापडल्यास त्यावर मात करु शकतो.
पण लक्षात ठेवा, पैसा हेच जीवनाचा केंद्रबिंदू नाही. (आणि ते का ते समजण्यासाठी पुढे वाचा)
2. सामाजिक संपत्ती (मान आणि सन्मान):
आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात आपला आदर व्हावा ही एक स्वाभाविक इच्छा आहे. पण सतत इतरांकडून कसा मान मिळेल याचा विचार करत राहिल्यास आपण दुःखी होऊ शकतो.
खरी सामाजिक संपत्ती मजबूत आणि प्रामाणिक नातेसंबंधांवर आधारित आहे. अशी नाती जिथे फक्त खोटी प्रशंसा नसून विश्वास आणि प्रामाणिकपणा असतो.
तुम्ही तुमचं लक्ष कुठे केंद्रित करत आहात?
जीवनातील सर्वात मोठी समस्या म्हणजे जेव्हा आपण फक्त दोन स्तंभांवर (आर्थिक आणि सामाजिक संपत्ती) लक्ष केंद्रित करतो आणि उर्वरित दोन स्तंभांकडे दुर्लक्ष करतो. या दोन्ही स्तंभांचंही तेवढंच महत्त्व आहे जितकं पहिल्यांचं. चला त्यांना समजून घेऊया.
3. वेळेची संपत्ती (वेळेवर स्वातंत्र्य):
खरे स्वातंत्र्य म्हणजे आपल्या वेळेवर पूर्ण नियंत्रण असणे.
वेळेवर स्वातंत्र्य असल्यास आपण आपल्या आवडीनुसार वेळ घालवू शकतो. जसे की कुटुंबासोबत वेळ घालवणे, छंद पूर्ण करणे इत्यादी.
जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बंधनकारक वेळापत्रक पाळावे लागेल. त्यामुळे तुमच्याकडे वेळेची संपत्ती कमी असते. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ती वापरू शकत नाही.
4. शारीरिक संपत्ती (निरोगी शरीर आणि शांत मन):
आपले आरोग्य हेच आपल्या आनंदी जीवनाचा पाया आहे. विचार करा, तुमच्याकडे पुरेसा पैसा आहे, मान-सन्मान मिळतोय, वेळही आहे, पण तुम्ही निरोगी नाहीत.
मग या सगळ्याचा काय उपयोग? तुम्हाला कुठेही जाता येत नाही, काहीही करता येत नाही. तर या सगळ्याचा काय उपयोग?
आता काय करायचं? तुम्हाला या ४ पैकी कोणत्या संपत्तीवर लक्ष केंद्रित करावं?
तुम्हाला या चारपैकी कोणत्याही एका स्तंभावर लक्ष केंद्रित करू नये. तुम्हाला या चार गोष्टींवर संतुलन राखून काम करायचे आहे.
एक नसून सर्व गोष्टी मिळवणे गरजेचे आहे. पुरेसा पैसा, लोकांकडून आदर, वेळेचे स्वातंत्र्य आणि चांगले आरोग्य.
त्यामुळे जीवनात तुम्ही काहीही कराल, तुम्ही कोणताही करिअर निवडाल, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला या चार स्तंभांवर एकत्र लक्ष केंद्रित करायचे आहे तरच तुम्ही पूर्णपणे आनंदी जीवन जगू शकता.
इतर पोस्ट वाचा 👉खर्चाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोण | TIME Vs MONEY
जॉइन टेलीग्राम चॅनल👉 (@marathifinance)