Mutual Fund SIP: एसआयपीसाठी 3 बेस्ट लार्ज कॅप / इंडेक्स फंड 2024

Mutual Fund SIP in Marathi: जर तुम्ही SIP साठी काही असे म्यूचुअल फंड शोधत आहात जिथे रिटर्न स्थिर असतील आणि मार्केटमधील रिस्कसुद्धा कमी असेल. अशा वेळी दोन कॅटेगरी माझ्या डोक्यात येतात म्हणजे इंडेक्स फंड आणि लार्ज कॅप फंड. या दोन्ही कॅटेगरी तुम्हाला लॉन्ग टर्ममध्ये 12% ते 15% चा रिटर्न देऊ शकतात. या ब्लॉग पोस्टमध्ये आपण 3 इंडेक्स फंड/लार्ज कॅप फंडबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये तुम्ही SIP करू शकता:

जॉइन टेलीग्राम चॅनल  @marathifinance

लार्ज कॅप म्यूचुअल फंड काय आहे? | What is Large Cap Mutual Fund?

लार्ज कॅप म्यूचुअल फंड म्हणजे असा म्यूचुअल फंड जो मार्केटमधील लार्ज कॅप स्टॉकमध्ये पैसे इन्वेस्ट करतो. आता हे लार्ज कॅप स्टॉक कसे ओळखायचे? अगदी सोप आहे? मार्केटमधील नंबर 1 कंपनी ते 100 वी कंपनी यांना लार्ज कॅप स्टॉक असे म्हणतात.

लार्ज कॅप फंडमध्ये मोठ मोठ्या कंपनीमध्ये पैसे इन्वेस्ट केलेले असतात त्यामुळे इथे रिस्क कमी असते. त्यासोबत सतत रिटर्न वर खाली होत नाही. त्यामुळे एका अर्थी रिस्क कमी असते. लार्ज कॅप फंडची तुलना NIFTY 50 INDEX किंवा NIFTY 100 सोबत केली जाते.

इंडेक्स फंड काय आहे? | What is Index Fund?

इंडेक्स फंड म्हणजे असा फंड जो ठराविक इंडेक्सला कॉपी करतो. आता आपण इथे फक्त लार्ज कॅप इंडेक्सबद्दल बोलतोय म्हणून आपण फक्त असे फंड घेणार जे NIFTY 50 INDEX, NIFTY 100, NIFTY NEXT 50 या इंडेक्सना कॉपी करतात.

लार्ज कॅप फंड आणि इंडेक्स फंडची चर्चा नेहमी एकत्र यासाठी होते की एखादा NIFTY 50 इंडेक्स फंड घेतला तरी तो मार्केटमधील टॉप 100 कंपनीपैकी 50 कंपनीमध्ये पैसे इन्वेस्ट करतो. आणि जर लार्ज कॅप फंड घेतला तरी तो टॉप 100 कंपनीपैकी काही कंपनीमध्ये पैसे इन्वेस्ट करतो. शेवटी दोघांचा बेंचमार्क इंडेक्स एकाच असतो. म्हणून यांना नेहमी कम्पेर केल जात.

ही पोस्ट वाचा   एसआयपीमध्ये ₹500 – ₹1000 पर्यंत गुंतवणूक करून किती फायदा होऊ शकतो?

म्यूचुअल फंड SIP साठी फंड कसे निवडायचे? | How to Select Fund for Mutual Fund SIP?

  • आर्थिक ध्येय – सगळ्यात आधी तुमच आर्थिक ध्येय काय आहे ते ठरवा.
  • टाइम –तुम्ही या SIP साठी किती टाइम देणार आहात.
  • रिस्क क्षमता – प्रत्येकाची रिस्क क्षमता वेगळी असते. आणि ज्यांची रिस्क क्षमता कमी आहे त्यांनी नेहमी इंडेक्स फंड किंवा लार्ज कॅप फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करावे.

2024 मध्ये SIP करण्यासाठी 3 बेस्ट इंडेक्स फंड/ लार्ज कॅप फंड | 3 Best Index Funds/Large Cap Funds for SIP in 2024

  • UTI Nifty Index Mutual Fund
  • Nippon India Large Cap Fund
  • HDFC Top 100 Fund

याबद्दल आपण जरा डीटेलमध्ये समजून घेऊ.

1) UTI Nifty Index Mutual Fund

या फंडमधील पैसे NIFTY 50 या इंडेक्समधील 50 कोमपणेमध्ये इन्वेस्ट केले जातात. NIFTY 50 एवढा रिटर्न आणणे या फंडचा फोकस आहे. या फंडचा Expense Ratio 0.21% एवढा आहे. या फंडमधून पैसे काढताना काही फी लागत नाही म्हणजे 0 Exit Load. या फंडचा Annualised Returns पुढीलप्रमाणे:

  • 1 Year Returns – 21.6%
  • 2 Year Returns – 17.6%
  • 3 Year Returns – 14.9%
  • 5 Year Returns – 15.4%
  • 10 Year Returns – 13.4%

2) Nippon India Large Cap Fund

हा एक लार्ज कॅप फंड आहे जो टॉप १०० कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो या फंडचा Expense Ratio ०.७६% एवढा आहे. इंडेक्स फंडच्या तुलनेत हा Expense Ratio जास्त आहे. कारण इंडेक्स फंड मध्ये फंड मॅनेजर ठराविक इंडेक्सला कॉपी करतो. पण इथे फंड मॅनेजरला रिसर्च करावी लागते आणि कंपन्या निवडाव्या लागतात. या फंडमधून पैसे काढताना १% Exit Load लागतो जर तुम्ही ७ दिवसात पैसे काढले. या फंडचा Annualised Returns पुढीलप्रमाणे:

  • 1 Year Returns – 37.6%
  • 2 Year Returns – 30.0%
  • 3 Year Returns – 24.8%
  • 5 Year Returns – 19.2%
  • 10 Year Returns – 17.8%

3) HDFC Top 100 Fund

हा एक लार्ज कॅप फंड आहे जो टॉप १०० कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो या फंडचा Expense Ratio ०.७६% एवढा आहे. इंडेक्स फंडच्या तुलनेत हा Expense Ratio जास्त आहे. कारण इंडेक्स फंड मध्ये फंड मॅनेजर ठराविक इंडेक्सला कॉपी करतो. पण इथे फंड मॅनेजरला रिसर्च करावी लागते आणि कंपन्या निवडाव्या लागतात. या फंडमधून पैसे काढताना १% Exit Load लागतो जर तुम्ही ७ दिवसात पैसे काढले. या फंडचा Annualised Returns पुढीलप्रमाणे:

  • 1 Year Returns – 32.7%
  • 2 Year Returns – 25.2%
  • 3 Year Returns – 20.7%
  • 5 Year Returns – 16.8%
  • 10 Year Returns – 15.1%

निष्कर्ष:

SIP साठी इंडेक्स फंड किंवा लार्ज कॅप फंड हे उत्तम पर्याय आहेत कारण ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला आणि स्थिर परतावा देतात.

तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, तुमचे गुंतवणुकीचे ध्येय, गुंतवणुकीचा कालावधी आणि रिस्क सहन करण्याची क्षमता याचा विचार करणे महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांनुसार योग्य फंड निवडू शकता.

सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQs

1. लार्ज कॅप म्यूचुअल फंड म्हणजे काय?

लार्ज कॅप म्यूचुअल फंड असा फंड आहे जो बाजारातील सर्वात मोठ्या आणि स्थिर कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतो. अशा कंपन्या सामान्यतः मार्केट कॅपिटालायझेशनमध्ये टॉप 100 मध्ये येतात. यामुळे या फंडमध्ये गुंतवणूक करणे कमी जोखमीचे असते आणि या फंडांचे रिटर्न स्थिर असतात.

2. इंडेक्स फंड म्हणजे काय?

इंडेक्स फंड असा फंड आहे जो विशिष्ट इंडेक्सला कॉपी करतो. उदाहरणार्थ, NIFTY 50, NIFTY 100, किंवा NIFTY NEXT 50. या फंडामध्ये टॉप कंपन्यांमध्ये गुंतवणूक होते आणि त्यामुळे जोखमीचे प्रमाण कमी असते, कारण हा फंड मार्केटच्या प्रदर्शनावर आधारित असतो.

3. लार्ज कॅप फंड आणि इंडेक्स फंडमधील फरक काय आहे?

लार्ज कॅप फंड आणि इंडेक्स फंड दोन्ही टॉप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, पण फरक एवढाच आहे की लार्ज कॅप फंड मॅनेजर्सच्या निवडीवर आधारित असतात, तर इंडेक्स फंड ठराविक इंडेक्सला फॉलो करतात. त्यामुळे इंडेक्स फंडामध्ये कमी मॅनेजमेंट खर्च असतो आणि हे फंड सामान्यतः कमी जोखमीचे असतात.

4. SIP साठी योग्य म्यूचुअल फंड कसा निवडावा?

SIP साठी म्यूचुअल फंड निवडताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात:

  • आर्थिक ध्येय: तुमचे उद्दिष्ट काय आहे ते ठरवा.
  • टाइम फ्रेम: तुम्ही किती काळासाठी गुंतवणूक करणार आहात.
  • रिस्क क्षमता: तुमची जोखीम क्षमता किती आहे, त्यानुसार इंडेक्स फंड किंवा लार्ज कॅप फंड निवडा.

5. 2024 साठी SIP करण्यासाठी 3 बेस्ट फंड कोणते आहेत?

  • UTI Nifty Index Mutual Fund: हा फंड NIFTY 50 इंडेक्सला फॉलो करतो.
  • Nippon India Large Cap Fund: हा फंड मार्केटमधील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो.
  • HDFC Top 100 Fund: हा फंड टॉप 100 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो.

Leave a Comment