HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy in Marathi: एचडीएफसी एर्गो ऑप्टिमा सिक्योर ही एक हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी आहे जी एचडीएफसी एर्गो जनरल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड (HDFC ERGO General Insurance Company Limited) कडून ऑफर केली जाते.
हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी म्हणजे अशी पॉलिसी जी तुमच्या आजारपणाचे सगळे खर्च कवर करते. तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे द्यायची गरज लागत नाही. (यावर डीटेल माहितीसाठी ही पोस्ट वाचा 👉 Best Health Insurance Policy कशी निवडाल?)
एचडीएफसी एर्गो ऑप्टिमा सिक्योर ही एक अशी पॉलिसी आहे जी जवजवळ सगळे बेनिफिट आणि चांगले Features उपलब्ध करून देते. आजच्या पोस्टमध्ये आपण या पॉलिसीबद्दल डीटेल माहिती मसजून घेणार आहोत जेणेकरून तूनच्यासाठी ही पॉलिसी चांगली आहे की नाही, घेतली पाहिजे की नाही हे तुम्ही ठरवू शकता.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
HDFC Ergo Optima Secure Pros (फायदे)
2x Cover: समजा तुम्ही 5 लाखची पॉलिसी घेत आहात तर पहिल्या दिवसापासून तुमच्या पॉलिसीचा कवर डबल होते म्हणजे 5 लाख + 5 लाख = 10 लाख
No Room Limit: तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती झालात तर तुम्हाला हवी ती रूम निवडू शकता. त्यावर काही लिमिट नाहीये.
No Co Payment: हॉस्पिटलच बिल कितीही येऊदेत तुम्हाला काही भराव लागणार नाही. (तुमच्या पॉलिसी कवर पर्यन्त) पण तुमची पॉलिसी 5 लाख + 5 लाख = 10 लाखची आहे आणि बिल 11 लाख आल तर मात्र वरचे 1 लाख तुम्हाला भरावे लागतील. (अधिक माहितीसाठी 👉 हेल्थ इन्शुरेंस Co-Payment म्हणजे काय?)
Post hospitalization Expenses: समजा तुम्हाला हॉस्पिटलमधून Discharge मिळाला आणि घरी आराम करायला सांगितला तर त्यासाठी लागणारे 180 दिवसानंतरचे खर्च कवर केले जातात.
HDFC Ergo Optima Secure Cons (तोटे)
Maternity Benefits: जर तुम्ही ही पॉलिसी Maternity Benefit साठी घेत असाल तर तो बेनिफिट या पॉलिसीमध्ये मिळत नाही.
Policy Cost: HDFC ब्रॅंडची पॉलिसी आहे त्यामुळे इतर कंपन्याच्या तुलनेत जरा महाग आहे.
HDFC Ergo Optima Secure Cons Add-ons (एक्स्ट्रा बेनिफिट)
Add-on म्हणजे एक्स्ट्रा बेनिफिट जे तुम्ही तुमच्या हिशोबाने पॉलिसी घेताना Add करू शकता. काही महत्वाचे Add ons जे तुम्ही या पॉलिसीमध्ये Add करू शकता पुढीलप्रमाणे आहेत.
- Cancer (except for initial stages, HIV-related, and skin cancer)
- Heart attack
- Stroke
- Kidney failure
- Multiple sclerosis
- Benign tumour of the brain or spinal cord
- Coma
- Dementia including Alzheimer’s disease.
एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जेवढे Add ons तुमच्या पॉलिसीमध्ये Add करणार तेवढा पॉलिसी प्रीमियम वाढणार. त्यामुळे जे गरजेचे आहेत तेच Add Ons पॉलिसीमध्ये Add करा.
या पॉलिसीसाठी किती प्रीमियम भराव लागेल?
आता हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळ असू शकते. त्यामुळे तुम्ही कुठे राहता (शहरात की गावी), तुम्हाला आधीपासून कोणता आजार आहे की नाही, तुम्ही दारू, तंबाखू किंवा सिगरेट ओढता की नाही तसेच तुमच्या मेडिकल चेकअपवरुन ठरवल जात.
ही हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी कुठून घेता येईल?
ही पॉलिसी तुम्ही जवळच्या HDFC बँकच्या ब्रांचमध्ये जावून घेऊ शकता. किंवा तुम्ही जिथे राहता तिथे एखादा एजेंट असेल तर त्याच्या मदतीने घेऊ शकता. आजकाल सगळ ऑनलाइन झाल आहे त्यामुएल HDFC Ergo App किंवा वेबसाइटवर जावून तुम्ही ही पॉलिसी घेऊ शकता.
फक्त पॉलिसी घेताना सगळ नीट वाचा आणि तुम्हाला जे बेनिफिट हवेत तेवढेच त्या पॉलिसीमध्ये Add करा. (कारण इन्शुरेंस घेताना खूप चुकीची सेलिंग केली जाते त्यामुमुळे जरा सावध रहा)
तुमच्या मित्रांसोबत ही पोस्ट शेअर करा ज्याना हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी घ्यायची आहे. या ब्लॉगवर आम्ही तुम्हाला योग्य माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत तुम्ही पण पोस्ट शेअर करून सपोर्ट करत रहा.
Thank You!
Khup mast..👍👌
Thank You Suraj