ET Money App ला 365.8 कोटींमध्ये विकत घेतले, तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल?

360 One Wealth and Asset Management (पूर्वीची IIFL Wealth) या कंपनीने ET Money या म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मला 365.8 कोटी रुपयांना विकत घेतले आहे, असे कंपनीने 12 जून 2024, बुधवारी संध्याकाळी स्टॉक एक्स्चेंजवर केलेल्या फायलिंगमध्ये जाहीर केले आहे.

Times Internet ही ET Money या म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मची मुख्य मालक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की ET Money ही कंपनी तशीच चालू राहील, फक्त मालक बदलले आहेत. त्यामुळे तुम्ही जर ET Money App चा वापर करून म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला टेंशन घेण्याचे कारण नाही. अजून एक गोष्ट म्हणजे Times Internet ही The Times of India या ग्रुपचा एक भाग आहे.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance

आता ET Money App हा 360 One या कंपनीची एक उपकंपनी म्हणून ओळखली जाईल. सध्या 360 One फक्त High Net Worth असलेल्या लोकांच्या पैशाचे व्यवस्थापन करत होती, पण ET Money प्लॅटफॉर्मच्या मदतीने ते मध्यमवर्गीय लोकांनाही त्यांच्या सेवा देऊ शकतात. ET Money App वर आजच्या तारखेला एकूण 9 लाख वापरकर्ते आहेत.

ET Money या म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मवर 28,000 कोटी एवढे पैसे व्यवस्थापित केले जातात, त्यापैकी 25,000 कोटी हे फक्त म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आहेत. आणि इतर उत्पादने धरून ET Money जवळजवळ 70,000 कोटी AUM (Asset Under Management) व्यवस्थापित करत आहे. ET Money ही अ‍ॅप Groww, Zerodha Coin, Paytm Money अशा गुंतवणूक अ‍ॅप्स सोबत स्पर्धा करत आहे.

ही पोस्ट वाचा   👉 SEBI च्या नव्या निर्णयामुळे Mutual Fund गुंतवणूकदारांना मोठा दिलासा! जाणून घ्या काय आहेत हे बदल

Frequently Asked Questions

360 One Wealth ने ET Money विकत घेतल्याची घोषणा कधी केली?

360 One Wealth ने ET Money विकत घेतल्याची घोषणा 12 जून 2024, बुधवारी संध्याकाळी स्टॉक एक्स्चेंजवर केलेल्या फायलिंगमध्ये केली आहे.

ET Money कंपनीचे चालू ऑपरेशन्स कसे राहणार आहेत?

ET Money कंपनी तशीच चालू राहील, फक्त मालक बदलले आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या सेवा वापरण्यात कोणताही बदल जाणवणार नाही.

360 One Wealth ने ET Money विकत घेण्यामागे काय उद्दिष्ट आहे?

सध्या 360 One Wealth फक्त उच्च निव्वळ मूल्य असलेल्या लोकांच्या पैशाचे व्यवस्थापन करते. ET Money प्लॅटफॉर्मच्या मदतीने ते मध्यमवर्गीय लोकांनाही त्यांच्या सेवा देऊ शकतील.

ET Money App वर किती वापरकर्ते आहेत?

ET Money App वर आजच्या तारखेला एकूण 9 लाख वापरकर्ते आहेत.

ET Money प्लॅटफॉर्मवर किती AUM (Asset Under Management) आहे?

ET Money प्लॅटफॉर्मवर 28,000 कोटी एवढे पैसे व्यवस्थापित केले जातात, त्यापैकी 25,000 कोटी हे फक्त म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आहेत. आणि इतर उत्पादने धरून, ET Money जवळजवळ 70,000 कोटी AUM व्यवस्थापित करत आहे.

ET Money कोणत्या गुंतवणूक अ‍ॅप्स सोबत स्पर्धा करत आहे?

ET Money ही अ‍ॅप Groww, Zerodha Coin, Paytm Money अशा गुंतवणूक अ‍ॅप्स सोबत स्पर्धा करत आहे.

वापरकर्त्यांना ET Money App वापरण्यात काही बदल जाणवणार आहेत का?

नाही, वापरकर्त्यांना त्यांच्या सेवा वापरण्यात कोणताही बदल जाणवणार नाही. ET Money ही कंपनी तशीच चालू राहील, फक्त मालक बदलले आहेत.

Leave a Comment