Motilal Oswal Nifty India Defence Index Mutual Fund NFO: डिफेन्स सेक्टरमध्ये इन्वेस्ट करण्याची संधी

Motilal Oswal Mutual Fund  ने एक नवीन म्यूचुअल फंड NFO (New Fund Offer) लॉंच केला आहे ज्याचं नाव आहे Motilal Oswal Nifty India Defence Index Fund Direct Growth. या नव्या फंडचा NFO १३ जून २०२४ रोजी सुरू झाला आहे आणि २४ जून २०२४ ला बंद होणार आहे. या फण्डची अलॉटमेंट तारीख २८ जून २०२४ ठरवली आहे. Motilal Oswal Nifty India Defence Index Fund Direct Growth च्या सुरुवातीची NAV (Net Asset Value) १० रुपये असेल. (कोणताही नवीन फण्ड लॉंच होताना त्याची NAV नेहमी १० रुपये असते)

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance

Defence Index Fund म्हणजे नक्की काय असतं? 

हा एक प्रकारचा इंडेक्स फंड आहे. याचा अर्थ फंड एका ठराविक इंडेक्सला कॉपी करतो आणि त्या इंडेक्सच्या रिटर्न एवढा रिटर्न इन्वेस्टरला आणून देतो. हा फंड ज्या इंडेक्सला कॉपी करणार आहे ती इंडेक्स आहे Nifty India Defence Total Return Index. आता या इंडेक्सच्या नावावरुन, तुम्हाला कल्पना आली असेल की त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या कंपन्या असतात.

लक्षात घ्या, हा एक Thematic फण्ड आहे जो एक विशिष्ट थीम फॉलो करतो तो म्हणजे Defence थीम. अर्थात बंदूक, विमान, जहाजे आणि अन्य डिफेन्स सेक्टरच्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करणे. या फंडमध्ये इन्वेस्ट करण्याऱ्या इन्वेस्टरना जबरदस्त रिटर्न्स मिळतो. पण एकाच सेक्टरमध्ये पैसे इन्वेस्ट केल्याने यामध्ये खूप जास्त रिस्क असते. 

Nifty India Defence Index Fund Direct Growth बद्दल माहिती:

Benchmark Index: या फंडच्या रिटर्नची तुलना NIFTY India Defence Total Return Index सोबत केली जाईल, थोडक्यात काय तर जेवढा रिटर्न या इंडेक्समध्ये मिळेल कमीत कमी तेवढा रिटर्न या फंडने दिला पाहिजे.

Investment Amount: तुम्ही कमीत कमी 500 रुपयापासून SIP ची सुरवात करू शकता तसेच जर एकत्र पैसे इन्वेस्ट करायचे असतील तरी तुम्ही कमीत कमी 500 रुपये इन्वेस्ट करू शकता. 

Exit Load: एक्जिट लोड म्हणजे जेव्हा तुम्ही या फंडमधून पैसे काढणार तेव्हा किती फी तुमच्याकडून  घेतली जाईल. या फंडमध्ये 15 दिवसांच्या  आतमध्ये पैसे काढल्यास 1% एवढा एक्जिट लोड घेतला जाईल.

Fund Risk: हा फंड एक Thematic किंवा सेक्टर फंड आहे. त्यामुळे यामध्ये रिस्क खूप खूप जास्त आहे. यामध्ये तुम्ही तेव्हाच इन्वेस्ट करा जर तुम्ही खूप रिस्क घेऊ शकता किंवा 5 पेक्षा जास्त वर्षासाठी पैसे इन्वेस्ट करू शकता. 

Motilal Oswal Mutual Fund कंपनीबद्दल माहिती:

Motilal Oswal Mutual Fund  कंपनीची सुरुवात 29 डिसेंबर 2009 मध्ये झाली आहे. ही कंपनी आजच्या तारखेला 53,720 कोटी एवढे पैसे मॅनेज करते. Motilal Oswal Financial Services Limited (MOFSL) ही कंपनी या म्यूचुअल फंडला स्पॉन्सर करते तसेच Motilal Oswal Trustee Company Limited ही कंपनी या म्यूचुअल फंडचे ट्रस्टी आहेत.

ही पोस्ट वाचा 👉 इटीएफ काय आहे? त्याचे प्रकार, फायदे आणि रिस्क जाणून घ्या

FAQs

Defence Index Fund म्हणजे काय

हा एक इंडेक्स फंड आहे ज्यामध्ये Nifty India Defence Total Return Index चा इंडेक्स फॉलो केला जातो.

Thematic फंड म्हणजे काय?

हा फंड डिफेंस सेक्टरवर फोकस करणारा एक Thematic फंड आहे, ज्यामध्ये बंदूक, विमान, जहाजे आणि इतर डिफेंस सेक्टरच्या कंपन्यांमध्ये निवेश केले जाते.

Motilal Oswal Mutual Fund कंपनीबद्दल माहिती

Motilal Oswal Mutual Fund कंपनीची स्थापना २९ डिसेंबर २००९ मध्ये झाली आहे. आता ही कंपनी ५३,७२० कोटी रुपयांचे प्रबंधन करते.

Leave a Comment