MONEY MANAGEMENT TIPS: लाइफ एक प्रवास आहे ज्यामध्ये तुमचे आत्ताचे निर्णय तुमचं भविष्य ठरवत असतात. आणि जेव्हा विषय पैशाचा येतो तेव्हा काही निर्णय असे आहेत जे तुम्ही खूप विचार करून घेतले पाहिजेत. पुढील 7 महत्वाचे पैशाचे धडे जे तुम्ही आयुष्यात लवकर शिकले पाहिजेत.
जॉइन टेलीग्राम चॅनल @marathifinance
1. तुमचा जीवनसाथी काळजीपूर्वक निवडा:
जीवनातील प्रत्येक मोठ्या निर्णयात तुमच्या जोडीदाराचा विचार करणे आवश्यक आहे. घराची निवड, वाहन निवड, सहलीची ठिकाणे निवडणे असे अनेक निर्णय तुम्हाला एकत्र घ्यावे लागतील. या निर्णयांमध्ये तुमचे विचार एकमेकांशी जुळणे गरजेचे आहे. म्हणूनच योग्य जोडीदार निवडणे अत्यंत महत्वाचे आहे.
2. रिटायरमेंटसाठी लवकर बचत सुरू करा:
रिटायरमेंटसाठी जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करणे हा एक उत्तम निर्णय आहे. पहिला नोकरी असताना पगार कमी असतो. तरीही, तुम्ही रिटायरमेंटसाठी दर महिन्याला किमान ₹500 बाजूला काढून ठेवले पाहिजेत. रक्कम लहान असली तरीही तुमच्याकडे बराच वेळ असतो, ज्यामुळे तुम्ही कमी पैशातही चांगला निवृत्ती निधी (Retirement Fund) तयार करू शकता. (जर शक्य असेल तर स्टेप अप SIP करा आणि दरवर्षी SIP रक्कम वाढवा.)
3. मोठ्या कॉलेज डिग्रीची गरज नाही:
आजकाल यशस्वी होण्यासाठी मोठ्या कॉलेज पदवीची गरज नाही. 2024 मध्ये आपण जगात आहोत आणि अनेक करिअर पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. तुम्ही YouTube वर हवं ते शिकू शकता. शिक्षण हे फक्त महाविद्यालयातच मिळते अशी कल्पना आपल्या डोक्यातून काढून टाकणे आवश्यक आहे. बुक्स, पॉडकास्ट, ऑनलाइन कोर्स इ. वापर करून तुम्ही हव ते शिकू शकता.
4. संधी शोधू नका, संधी निर्माण करा:
पैसा कमवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. एखादे स्किल शिका आणि त्यातून तुम्ही पैसे कसे कमवू शकता याचा विचार करा. उदाहरणार्थ, तुम्ही YouTube चॅनेल चालवू शकता, ब्लॉगिंग करू शकता, फोटोग्राफी करू शकता किंवा सोशल मीडिया मार्केटिंग करू शकता. पण तुम्हाला एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे.
ही पोस्ट वाचा तुमच्या वीकेंडचा वापर आर्थिक स्वातंत्र्यासाठी कसा कराल?
5. “नाही” म्हणायला शिका:
खरं सांगा, कोणाला नाही म्हणताना तुम्हाला वाईट वाटतं ना? पण आता तुम्हाला हे स्किल शिकणे आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामावर काम करत असताना मित्राचा मेसेज येतो किंवा घरगुती कामे सांगितली जातात अशा वेळी तुम्ही “नाही” म्हणायला शिकले पाहिजे. त्यांना समजावून सांगा की तुम्ही काहीतरी महत्वाचे काम करत आहात आणि ते नक्कीच समजून घेतील. (माझ्या अनुभवातून सांगत आहे)
6. वेळ ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे:
एलोन मस्क, मुकेश अंबानी किंवा तुम्ही आणि मी सर्वांना देवाने दिवसाला फक्त 24 तास दिले आहेत. पण तुम्ही हे 24 तास कसे वापरता यावर तुम्ही जीवनात कुठे आहात हे अवलंबून आहे. मी तुम्हाला स्वतःची एलोन मस्कसोबत तुलना करायला सांगत नाही. माझा मुद्दा असा आहे की वेळ किती मौल्यवान आहे हे ओळखा आणि त्याचा गैरवापर करू नका.
7. वाचन करा:
शाळेच्या भिंतीवर एक सुविचार लिहिलेला असतो तो म्हणजे “वाचाल तर वाचाल”. शाळेत असताना त्याचा अर्थ कधी समजला नाही. ना मी कधी त्यावर लक्ष दिल. पण आता फायनॅन्स आणि सेल्फ हेल्पवरील 50+ पुस्तके वाचून आता समजत आहे त्या सुविचाराचा खरा अर्थ काय होता. वाचन एक पॉवरफूल स्किल आहे ज्याचा वापर करून तुम्ही हव ते शिकू शकता.
पुस्तके वाचण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही चांगल्या ब्लॉगचा आधार घेऊ शकता. मी माझा ब्लॉग याच उद्देशाने तयार केला आहे – लोकांना प्रेरणा देणं आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या आणि वैयक्तिकरित्या यशस्वी होण्यासाठी मदत करणं.
निष्कर्ष
जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी, लवकर आणि योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्वाचे आहे. वरील 7 पैशाचे धडे (MONEY MANAGEMENT TIPS) तुम्हाला तुमच्या आर्थिक भविष्यासाठी चांगला पाया घालण्यास मदत करतील.
कारण लाइफमध्ये पैसे कमविण्यासाठी फक्त एक स्किल नाही तर खूप साऱ्या स्किल्सची गरज असते. म्हणून या 7 धड्यांचा वापर करून तुम्ही तुमचे आर्थिक ध्येय साध्य करू शकता आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि समाधानी जीवन जगू शकता.
ही पोस्ट वाचा मी नोकरी करतोय पण आर्थिक स्वातंत्र्यासाठी अजून काय केल पाहिजे?
Frequently Asked Questions
1. जीवनसाथी काळजीपूर्वक निवडणे महत्वाचे आहे?
जीवनातील प्रत्येक मोठ्या निर्णयात तुमच्या जोडीदाराचा विचार करणे आवश्यक आहे. घराची निवड, वाहन निवड, सहलीची ठिकाणे निवडणे असे अनेक निर्णय तुम्हाला एकत्र घ्यावे लागतील. या निर्णयांमध्ये तुमचे विचार एकमेकांशी जुळणे गरजेचे आहे. म्हणूनच योग्य जोडीदार निवडणे अत्यंत महत्वाचे आहे.
2. रिटायरमेंटसाठी लवकर बचत सुरू का करावी?
रिटायरमेंटसाठी जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करणे हा एक उत्तम निर्णय आहे. पहिला नोकरी असताना पगार कमी असतो, तरीही तुम्ही रिटायरमेंटसाठी दर महिन्याला किमान ₹500 बाजूला काढून ठेवले पाहिजेत. रक्कम लहान असली तरीही तुमच्याकडे बराच वेळ असतो, ज्यामुळे तुम्ही कमी पैशातही चांगला निवृत्ती निधी (Retirement Fund) तयार करू शकता.
3. मोठ्या कॉलेज डिग्रीची गरज का नाही?
आजकाल यशस्वी होण्यासाठी मोठ्या कॉलेज पदवीची गरज नाही. 2024 मध्ये आपण जगात आहोत आणि अनेक करिअर पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. तुम्ही YouTube वर हवं ते शिकू शकता. शिक्षण हे फक्त महाविद्यालयातच मिळते अशी कल्पना आपल्या डोक्यातून काढून टाकणे आवश्यक आहे.
4. संधी शोधण्याऐवजी संधी निर्माण का करावी?
पैसा कमवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. एखादे स्किल शिका आणि त्यातून तुम्ही पैसे कसे कमवू शकता याचा विचार करा. उदाहरणार्थ, तुम्ही YouTube चॅनेल चालवू शकता, ब्लॉगिंग करू शकता, फोटोग्राफी करू शकता किंवा सोशल मीडिया मार्केटिंग करू शकता. पण तुम्हाला एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे.
5. वेळ का सर्वात मोठी संपत्ती आहे?
एलोन मस्क, मुकेश अंबानी किंवा तुम्ही आणि मी सर्वांना देवाने दिवसाला फक्त 24 तास दिले आहेत. पण तुम्ही हे 24 तास कसे वापरता यावर तुम्ही जीवनात कुठे आहात हे अवलंबून आहे. वेळ किती मौल्यवान आहे हे ओळखा आणि त्याचा गैरवापर करू नका.
6. Money Management का महत्वाचे आहे?
Money Management च्या माध्यमातून तुम्ही तुमचे आर्थिक ध्येय साध्य करू शकता आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि समाधानी जीवन जगू शकता. Money Management मध्ये चांगला पाया घालण्यासाठी लवकर आणि योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्वाचे आहे.