2024 मध्ये सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या Top 3 ETFs, एका वर्षात 116% रिटर्न!

5/5 - (3 votes)

इटीएफ (ETF) म्हणजे एक प्रकारचा फंड किंवा शेअर असतो जो अनेक शेअर्सना एकत्र करून किंवा इतर ऍसेट्सना एकत्र करून बनविला जातो. इतर म्युच्युअल फंडपेक्षा इटीएफमध्ये फरक हाच आहे की या फंडची किंवा शेअरची खरेदी-विक्री मार्केट टाइमिंगमध्ये करता येते.

एखादी म्युच्युअल फंड कंपनी विविध कंपन्यांचे शेअर्स विकत घेते आणि त्याची एक इटीएफ बनवते. आता ही इटीएफ तुम्ही एखाद्या शेअरप्रमाणे ट्रॅक करू शकता. जसा तुम्ही एखादा शेअर घेतात त्याच प्रमाणे याची खरेदी-विक्री करू शकता. पण इटीएफ ही फक्त शेअर्सची नसते तर इतर ऍसेट्स जसे की बॉन्ड्स, गोल्ड, सिल्व्हर इ.ची पण असू शकते. 1 वर्षात सगळ्यात जास्त रिटर्न देणाऱ्या इटीएफ पुढीलप्रमाणे आहेत:

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance

1) CPSE ETF

सगळ्यात आधी हे CPSE काय आहे ते समजून घेऊ. CPSE म्हणजे Central Public Sector Enterprises, म्हणजेच सरकारी कंपन्या. CPSE ETF ला Nippon India Mutual Fund कंपनी मॅनेज करते. या इटीएफ ची चालू NAV (Net Asset Value) Rs. 93.96 एवढी आहे.

CPSE ETF ची AUM (Asset Under Management) Rs 41,260 करोंड एवढी आहे. या ETF ने एका वर्षात 116% एवढा रिटर्न दिला आहे. आणि या ETF चा Expense रेशियो खूप कमी म्हणजे 0.05 एवढा आहे. या ETF मध्ये टोटल 11 स्टॉक आहेत, ज्या सगळ्या सरकारी कंपन्या आहेत, जस की Power Grid Corporation, NTPC, Coal India इत्यादी.

2) Motilal Oswal S&P BSE Enhanced Value ETF

जसे या ETF चे नाव वाचून समजले असेल की ही Bombay Stock Exchange वरील आशा स्टॉक्समध्ये पैसे इन्वेस्ट करते जे फंड मॅनेजर कमी किंमतमध्ये मिळतात पण त्यांची खरी वॅल्यू जास्त आहे. या इन्वेस्टिंग स्टाइलला value/contrarian स्टाइल असे म्हणतात. या ETF ला Motilal Oswal Mutual Fund कंपनी मॅनेज करते.

या ETF ची चालू NAV (Net Asset Value) Rs. 104.23 एवढी आहे. या ETF ची AUM (Asset Under Management) Rs 80 करोंड एवढी आहे. या ETF ने एका वर्षात 97.6% एवढा रिटर्न दिला आहे. आणि या ETF चा Expense रेशियो खूप कमी म्हणजे 0.30 एवढा आहे. या ETF मध्ये टोटल 30 स्टॉक आहेत, ज्यापैकी काही मुख्य कंपन्या आहेत, जसे की Hindalco, SBI, Grasim Industries इत्यादी.

3) ICICI Prudential Nifty PSU Bank ETF

सगळ्यात आधी हे PSU Bank काय आहे ते समजून घेऊ. PSU Banks म्हणजे Public Sector Units Banks, म्हणजेच सरकारी बँका. ICICI Prudential Nifty PSU Bank ETF ही इटीएफ फक्त आणि फक्त सरकारी बँकाच्या स्टॉक्समध्ये पैसे इन्वेस्ट करते. या ETF ला ICICI Prudential Mutual Fund कंपनी मॅनेज करते. या ETF ची चालू NAV (Net Asset Value) Rs. 75.26 एवढी आहे.

CPSE ETF ची AUM (Asset Under Management) फक्त Rs 66 करोंड एवढी आहे. या ETF ने एका वर्षात 84.4% एवढा रिटर्न दिला आहे. आणि या ETF चा Expense रेशियो खूप कमी म्हणजे 0.40 एवढा आहे. या ETF मध्ये टोटल 12 स्टॉक आहेत, ज्या सगळ्या सरकारी बँका आहेत, जसे की SBI, Bank of Baroda, Canara Bank इत्यादी.

एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या ETFs चा रिटर्नचा डेटा हा 31 मे 2024 पर्यंतचा आहे. ETF असो की इतर इन्वेस्टमेंट तुम्ही कधी एंट्री घेता आणि कधी बाहेर पडता यावरून तुम्हाला किती रिटर्न मिळणार हे ठरत असत.

ही पोस्ट वाचा 👉 इटीएफ काय आहे? त्याचे प्रकार, फायदे आणि रिस्क जाणून घ्या

FAQ

इटीएफ म्हणजे काय?

इटीएफ म्हणजे एक्स्चेंज ट्रेडेड फंड, जो अनेक शेअर्स किंवा इतर ऍसेट्स एकत्र करून बनविला जातो. इटीएफचे खरेदी-विक्री मार्केटमध्ये शेअर्सप्रमाणे करता येते.

इटीएफ आणि म्युच्युअल फंडमध्ये काय फरक आहे?

इटीएफचे खरेदी-विक्री मार्केट टाइमिंगमध्ये करता येते, जसे की शेअर्स. म्युच्युअल फंडाची खरेदी-विक्री फक्त ट्रेडिंग सत्राच्या शेवटी केल्या जातात.

CPSE ETF म्हणजे काय?

CPSE ETF म्हणजे Central Public Sector Enterprises ETF, ज्यामध्ये सरकारी कंपन्यांचे शेअर्स असतात. हे Nippon India Mutual Fund कंपनीद्वारे मॅनेज केले जाते.

Motilal Oswal S&P BSE Enhanced Value ETF म्हणजे काय?

ही इटीएफ Bombay Stock Exchange वरील कमी किंमतीमध्ये मिळणारे, पण उच्च वॅल्यू असणारे स्टॉक्समध्ये पैसे इन्वेस्ट करते. हे Motilal Oswal Mutual Fund कंपनीद्वारे मॅनेज केले जाते.

ICICI Prudential Nifty PSU Bank ETF म्हणजे काय?

ही इटीएफ फक्त सरकारी बँकांच्या स्टॉक्समध्ये पैसे इन्वेस्ट करते. हे ICICI Prudential Mutual Fund कंपनीद्वारे मॅनेज केले जाते.

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi