गेल्या काही महिन्यांत, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, आणि अॅक्सिस बँक सारख्या खासगी कर्जदात्यांनी वैयक्तिक कर्जाच्या (Personal Loans) व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नोव्हेंबर 2023 मध्ये अशा प्रकारच्या कर्जांना अधिक धोकादायक मानले आहे, असे इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालात म्हटले आहे.
बँकांच्या डेटावरून, अहवालात असे म्हटले आहे की वैयक्तिक कर्जाच्या (Personal Loan) दरांमध्ये 30-50 बेसिस पॉइंट्स (bps) ची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात, Reserve Bank of India ने असुरक्षित किरकोळ कर्जामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाढीवर चिंता व्यक्त केली होती आणि वैयक्तिक कर्जांच्या (Personal Loan) रिस्कमध्ये वाढ होत आहे, ज्यामुळे कर्ज देणाऱ्या बँकाना अधिक सावध राहण्यास आणि अशा कर्जांचे जास्त प्रमाणात वाटप न करण्यास प्रोत्साहित केले.
RBI ने वैयक्तिक कर्जाचे Risk Weightage 100 टक्क्यांवरून 125 टक्क्यांवर वाढवले होते. क्रेडिट कार्ड कर्जासाठी, हे 125 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर वाढवण्यात आले होते.
नवीन वैयक्तिक कर्ज (Personal Loan) व्याजदर खालीलप्रमाणे आहेत –
- ICICI बँक आता वैयक्तिक कर्ज 10.80 टक्के व्याजदराने देते, जो आधी 10.50 टक्के होता.
- कोटक महिंद्रा बँक 10.99 टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्ज देते, जो गेल्या वर्षाच्या अखेरीस 10.50 टक्के होता.
- HDFC बँकेचे वैयक्तिक कर्ज एप्रिलपासून 10.75 टक्के व्याजदराने दिले जात आहे, जो जानेवारी ते मार्च या काळात 10.35 टक्के होता.
- अॅक्सिस बँक 10.99 टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्ज देते, जो RBI च्या जोखीम घोषणेनंतर 10.49 टक्के होता.
RBI च्या डेटानुसार, मे 2024 मध्ये किरकोळ कर्ज वाढ 17.8 टक्क्यांवर आली आहे, जी मे 2023 मध्ये 19.1 टक्के होती. म्हणजे कर्ज देण्याच प्रमाण कमी झाले आहे. तसेच असुरक्षित वैयक्तिक कर्जांच्या, जसे ‘क्रेडिट कार्ड थकबाकी’ ची वाढ नोव्हेंबर 2023 मध्ये 34.2 टक्क्यांवरून एप्रिल 2024 मध्ये 23 टक्क्यांवर आली आहे. याचा अर्थ क्रेडिट कार्ड थकबाकीसुद्धा कमी झाली आहे. RBI ने नोव्हेंबर 2023 मध्ये वैयक्तिक कर्जाच्या (Personal Loan) दरांमध्ये 30-50 बेसिस पॉइंट्स (bps) ची वाढ केली यामुळेच हा फरक पडला आहे.
ही वाढ कर्ज घेणाऱ्यांवर कसा परिणाम करेल?
वैयक्तिक कर्जाचे दर वाढल्यामुळे कर्ज घेणाऱ्यांना अधिक व्याज द्यावे लागेल. त्यामुळे मासिक EMI मध्ये वाढ होऊ शकते आणि कर्ज घेण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे कर्जदारांना त्यांच्या वित्तीय व्यवस्थापनात अधिक सावधगिरी बाळगावी लागेल.
जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance
FAQs
RBI ने वैयक्तिक कर्जाच्या दरांमध्ये वाढ का केली?
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नोव्हेंबर 2023 मध्ये असुरक्षित किरकोळ कर्जाच्या अत्यधिक वाढीवर चिंता व्यक्त केली होती. कर्जदात्यांना अधिक सावध राहण्यास आणि अशा कर्जांचे जास्त प्रमाणात वाटप न करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी वैयक्तिक कर्जांच्या रिस्क वेटेजमध्ये वाढ केली.
वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात किती वाढ झाली आहे?
बँकांच्या डेटानुसार, वैयक्तिक कर्जाच्या दरांमध्ये 30-50 बेसिस पॉइंट्स (bps) ची वाढ झाली आहे. उदा. ICICI बँकचा व्याजदर 10.50% वरून 10.80% पर्यंत वाढला आहे.
कोणत्या बँकांनी वैयक्तिक कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत?
ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, आणि अॅक्सिस बँक या प्रमुख बँकांनी वैयक्तिक कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत.