Mutual Fund मध्ये धडाकेबाज वाढ: 2 महिन्यांत 81 लाख नवीन Folios, जाणून घ्या वाढीमागील कारणे!

5/5 - (5 votes)

Association of Mutual Funds in India (AMFI) च्या लेटेस्ट डेटानुसार असे दिसून आले आहे की Mutual Fund इंडस्ट्रीमध्ये टोटल Folios ची संख्या 18.6 करोड झाली आहे. आता हा Folio म्हणजे नक्की काय? जेव्हा तुम्ही एखाद्या फंडमध्ये SIP करता किंवा एकत्र पैसे जमा करता, तेव्हा तुम्हाला एक ठराविक नंबर दिला जातो, त्याला Folio Number म्हणतात. बँकेत जसे तुमचे अकाऊंट नंबर असते, अगदी तसेच म्युच्युअल फंड कंपनीकडे तुमचा अकाऊंट नंबर म्हणजे Folio Number असतो.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance

Mutual Fund इंडस्ट्रीमध्ये फक्त 2 महिन्यात 81 लाख नवीन Folios सुरू झाले आहेत. मार्च 2024 मध्ये टोटल Folios चा आकडा हा 17.78 करोड होता. त्यामध्ये 4.6% ने वाढ होऊन मे शेवटपर्यंत हा आकडा आता 18.6 करोडवर पोचला आहे.

Mutual Fund इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टर वाढण्याची कारणे:

लोकांचा बँक FD बद्दल असलेला दृष्टिकोन बदलत आहे. लोकांना समजले आहे की पैसे वाढवायचे असतील तर ते बँकेत ठेवून चालणार नाहीत, तर चांगल्या रिटर्नसाठी Mutual Fund ध्ये इन्व्हेस्ट करावे लागेल. यासोबतच लोकांच्या इनकममध्ये देखील वाढ होत आहे, त्यामुळे खूप सारे नवीन इन्व्हेस्टर म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये येत आहेत.

वाढ होण्याचे अजून एक कारण म्हणजे शेअर मार्केटमध्ये होणारी वाढ आणि त्याबद्दल वाढलेली जागरूकता ही देखील कारणे आहेत ज्यामुळे म्युच्युअल फंड इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. PGIM India Mutual Fund चे CBO अभिषेक तिवारी यांनी सांगितले की इन्व्हेस्टर आता अशा Asset मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला बघत आहेत जे लॉन्ग टर्ममध्ये वाढत्या महागाईला मागे टाकू शकते, आणि म्युच्युअल फंडमध्ये ती क्षमता आहे.

मोठमोठे क्रिकेटर्स सध्या “म्युच्युअल फंड सही है” अशा Ad करत असतात, याने म्युच्युअल फंडमधील जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच आजकाल मोठ्या प्रमाणात यूट्यूब तसेच इंस्टाग्राम वर Finance Influencers म्युच्युअल फंड बद्दल नॉलेज देत असतात, याने देखील ही वाढ होत आहे.

ही पोस्ट वाचा   👉 फ्लेक्सिबल इन्वेस्टमेंटसाठी फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड निवडा: Top 3 Flexi Cap Mutual Funds 2024

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1: Folio म्हणजे काय?

उत्तर: जेव्हा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये SIP करता किंवा एकत्र पैसे जमा करता, तेव्हा तुम्हाला एक ठराविक नंबर दिला जातो, त्याला Folio Number म्हणतात. बँकेत जसे तुमचे अकाऊंट नंबर असते, तसेच म्युच्युअल फंड कंपनीकडे तुमचा अकाऊंट नंबर म्हणजे Folio Number असतो.

प्रश्न 2: टोटल Folios ची संख्या किती झाली आहे?

उत्तर: Association of Mutual Funds in India (AMFI) च्या लेटेस्ट डेटानुसार म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये टोटल Folios ची संख्या 18.6 करोड झाली आहे.

प्रश्न 3: नवीन Folios मध्ये किती वाढ झाली आहे?

उत्तर: फक्त 2 महिन्यात 81 लाख नवीन Folios सुरू झाले आहेत. मार्च 2024 मध्ये टोटल Folios चा आकडा 17.78 करोड होता आणि मे शेवटपर्यंत हा आकडा 18.6 करोडवर पोचला आहे, म्हणजेच 4.6% वाढ झाली आहे.

प्रश्न 4: म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टर वाढण्याची कारणे काय आहेत?

उत्तर:

  1. बँक FD बद्दल दृष्टिकोन बदल: लोकांना समजले आहे की पैसे वाढवायचे असतील तर ते बँकेत ठेवून चालणार नाहीत, तर चांगल्या रिटर्नसाठी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावे लागेल.
  2. लोकांच्या इनकममध्ये वाढ: इनकम वाढल्यामुळे खूप सारे नवीन इन्व्हेस्टर म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये येत आहेत.
  3. शेअर मार्केटमध्ये वाढ: शेअर मार्केटमध्ये होणारी वाढ आणि त्याबद्दल वाढलेली जागरूकता.
  4. प्रसिद्ध व्यक्तींचे समर्थन: मोठमोठे क्रिकेटर्स “म्युच्युअल फंड सही है” अशा Ad करत असतात.
  5. फायनान्स इन्फ्लुएंसर्स: यूट्यूब आणि इंस्टाग्राम वर Finance Influencers म्युच्युअल फंड बद्दल नॉलेज देत असतात.

प्रश्न 5: म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे फायदे काय आहेत?

उत्तर: म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्याने लॉन्ग टर्ममध्ये वाढत्या महागाईला मागे टाकण्याची क्षमता आहे. शिवाय, हे एक चांगले रिटर्न देणारे साधन आहे, ज्यामुळे अनेक इन्व्हेस्टर आकर्षित होतात.

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi